मेळघाटातील डॉक्टराचा अकोल्यात मृत्यू!

54.jpg
54.jpg
Updated on: 

अकोला : मेळघाटात म्हणून कार्यरत असलेल्या एका कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांचा रविवारी (ता.31) कोरोनामुळे मृत्यू झाला. अकोला येथील आयसोल्युशन कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल  38 वर्षीय सीएचओ (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर ते त्यांच्या घरी अकोला आले होते. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू होते विशेष म्हणजे ते येथील एका प्रतिष्ठित परिसरात राहणारे असून, मागील तीन ते चार दिवसापासून ते रुग्णालयात भरती होते. मात्र भरती होताना त्यांनी अमरावती येथील पत्ता दिला होता. मात्र आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

परिवारातील एकही जण नाही आला भेटण्यास
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मागील चार दिवसांपासून त्यांच्या कुटुंबातील एकही जण त्यांना भेटावयास आले नसल्याची धक्कादायक माहितीही प्राप्त झाली आहे.

अकोल्यात आल्यानंतर झाला कोरोना
मृत्यू झालेले डॉक्टर मेळघाटात तारूबांदा येथे कार्यरत होते. ते त्यांच्या घरी अकोल्याला गेल्यावर त्यांना कोरोना झाला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हे अमरावती कोविड रुग्णालयात कधीही दाखल नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

water issue in akola
Agriculture Loss by No Rain
Engineer Shriram Hazare Donates Award Money for Drought-Affected Farmers
Khamgaon APMC Extends Financial Aid of Rs 11 Lakhs for Drought-Affected Farmers
Marathi News Esakal
www.esakal.com